Komal Builders – leakage in my upper side toilet

Reported By: Shilpa vijay lohar

Contact information:
Komal Builders Lakshyadeep building plot no.36, sect-2 Taloja Phase-1 Navi mumbai, India
[email protected]

C/o ward no 13, kharghar.

विषय : किचनमध्ये टॉयलेट चे घाण सांडपाणी लिकेजः बाबत

To,
Respected sir,

मी विजय बाबुराव लोहार, फ्लॅट नंबर 202, लक्ष्यादिप बिल्डिंग, सेक्टर 2 प्लॉट 36, फेस 1, तळोजा,

येथील रहिवाशी असून 5 डिसेंबर 2015 मध्ये आमच्या घरचे ragistraion खांदा कॉलनी येथे झाले असून आम्हाला त्याचा ताबा जून 2016 मध्ये दिला आहे. पण माझी तक्रार अशी आहे की गेल्या जुलै 2017 पासून माझ्या किचन मध्ये आमच्या वरील रूम 302 मधून टॉयलेट चे घाण सांडपाणी लिकेजे होत आहे. तरी आम्ही वारंवार 302 रूम मालक यांना सांगत येत आहोत. परंतु ते काही टॉयलेट चे काम करून घेण्यास तयार नाहीत. ते काम बिल्डर चे आहे त्यांच्या कडून हे काम करून घ्या असे बोलतात. मग आम्ही कोमल बिल्डर (अशोक बन्सीलाल पुरोहित) (शर्मा), माळा नम्बर 301/302, अमृत कलश, फ्लॅट नंबर 90/91/92, सेक्टर 28, नेरूळ, नवी मुंबई. यांना आमच्या प्रॉब्लेम बद्दल सविस्तर सांगितले आणि रूम मध्ये कुठून पाणी येत आहे हे देखील दाखवले पण ते देखील हात वर करत आहेत. हे काम रूम 302 च्याा मालकाचे आहे असे सांगितले. कारण सोसायटी चा सदर maintaince माझ्याकडे येत नाही त्यामुळे जर का माझ्याकडे maintaince असते तर मी हे काम करून दिले असते परंतु आता माझ्याकडे maintaince येत नाही त्यामुळे तुम्ही रूम 302 चे मालक यांकडूनच काम करून घ्यावे अथवा सोसायटी maintaince मधून करून घ्यावे असे सुचविले.
या संदर्भात सोसायटी सर्व owners la वारंवार wtsup द्वारे पाणी गळती चे फोटोज् send केले आणि अर्ज ही दिला परंतु chairman ani इतर कुटल्याही सदस्यांनी यावर काहीही चर्चा केली नाही अथवा आमचे काम करून घेण्यास आमचे वरील मालकांना सांगितले नाही उलट तो तुमचा पर्सनल मॅटर आहे असे सांगून हात वर केले. पण दरवर्षी पावसाळ्यात देखील बाहेरून आमच्या रूम मध्ये पाणी येते आणि पावसाळा संपला की बंद होते. आणि परत वरील रूम मधून पाणी गळती चालू होते. त्यामुळे आम्ही सदर सोसायटी maintaince जानेवारी 2019 पासून थांबविला आहे. पण आता रूम 302 चे मालक यांना पाणी गळती कुठून होत आहे हे दाखऊन सुद्धा ते काम करून घेण्यास तयार नाही याचा आम्हाला खूप खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाविलाजने आम्ही advocate ganesh mukane, पनवेल.
Cont [protected]/ [protected] यांना या संदर्भात सर्व माहिती दिली आणि त्यांच्याकडून कोमल बिल्डर आणि रूम 302 चे मालक मनोज नवले यांनी सदर नोटीस दिनांक 27.7.18 रोजी पाठून दिली परंतु याने देखील त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. ते काम करून घेण्यास तयार नाही. त्यांचे म्हणणे आहे की तुम्ही बिल्डर कडूनच काम करून घ्या.
आम्ही गेली 4 वर्ष झाली स्वखर्चतून आमच्या किचन मधील पाणी गळतीमुळे घाण झालेले स्लॅब नीट करून घेत आहोत. परंतु दरवर्षी पावसाळ्यात पण पाणी येते आणि पावसाळा संपला की वरच्या रूम मधून पाणी गळती होते. हे पाणी सारखे सारखे गळत राहून ते खाली न ओसरता किचन मधील स्लॅब मध्ये मुरून मुरून चालले आहे आणि त्यामुळे साईड चे पिलर सुध्दा खराब होत चालले आहे. हे पाणी सतत मुरल्यामुळे भविष्यात किचन चे स्लॅब ला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात काही नको ती घटना घडली तर त्याला जबाबदार कोण???कोमल बिल्डर का मनोज नवले का सोसायटी अध्यक्ष्य???

त्यासाठी आम्ही भांडण नको म्हणून येथील सदर भाजप कार्यकर्ता निर्दोष केनी दादा यांना देखील वारंवार सांगितले, काँग्रेस कार्यकर्ता त्रयबक केनी दादा आणि सामाजिक एकता संस्था यांचे कार्यकर्ता प्रसाद पाटील यांना देखील सांगितले. पण या बड्या नेत्यांचे देखील हे लोक ऐकत नाही. आम्ही नेते लोकांना सांगण्याचे एकच कारण की त्यांचे ऐकून तरी ते काम करतील आणि भांडण तंटा होणार नाही. पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्यास गेले तर तेथे वारंवार गेलो पण तिथे ही दाद भेटत नाही उलट तिथे आम्हाला बोलले जाते की त्यांनी जर तुम्हाला शिवी गाळ केली तरच तूम्ही आमच्याकडे या. नाहीतर ते रीतसर complaint karun घेण्यास तयार नाहीत. मग आम्ही जायचे कोणाकडे???

त्यानंतर आम्ही दिनांक 28.2.20 रोजी
सहनिबंधक सहकारी संस्था सिडको कार्यालय, रायगड भवन, 3rd फ्लोअर, सीबीडी बेलापूर.
Cont[protected]/ 27574505
यांच्या कार्यालयात देखील एक लेखी तक्रार दाखल केली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

जा. क्र. सनि/ससं/सिडको – 1968/2020 dtd – 28.2.20

परंतु ही तक्रार दाखल केल्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले. आणि आजही सुरू आहे. त्यामुळे आम्ही परत एकदा दिनांक 15.5.20 रोजी खारघर वॉर्ड क्रमांक 13. येथील एका कर्मचारी cont [protected] यांच्यासंगे संपर्क केला असता त्यांनी आम्हाला कार्यालयात येण्यास मनाई केली ते म्हणाले की कोरोणा मुळे तुम्हाला येथे कोणीही भेटणार नाही त्यामुळे तुम्ही एक लेखी अर्ज करा असे सांगितले आणि एक mail id दिला आणि यावर तक्रार नोंदवण्यासाठी सांगितले. त्यामुळे मगआम्ही ही तक्रार आता पनवेल महानगरपालिका येथील कार्यालयात करत आहोत.

सदर हा प्रॉब्लेम गेल्या 4 वर्षापासून निरंतर चालू आहे पुढे जाऊन हा धोका वाढू शकतो. माझ्या घरात लहान मुल बाळ आहेत. आणि कोरोनाचा वाढता प्रभाव बगता मनावर ताण येऊ लागला आहे. रोज रोज हा त्रास विनाकारण सहन करावा लागत आहे लाखो रुपये खर्च करून आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे. कुणीही याकडे लक्ष्य देण्यास तयार नाही. त्यामुळे माझी तुमच्याकडे कळकळीची नम्रविनंती आहे की एकदा तुमच्या कार्यालयातून एखादा माणूस आमच्या घरी पाठून तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी पडताळून पहावे. आणि आमचे गेल्या 4 वर्षात जे काही नुकसान झाले आहे त्याची सर्व काही नुकसान भरपाई भरून देण्यास सांगावे ही कळकळीची नम्राविनंती.

कळावे,
आपला आदरणीय,
विजय बाबुराव लोहार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *